न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी प्रतिनिधी : काळेवाडीतील तापकिरनगर येथील शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय व एल.बी.टी. इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व मा. प्रधानमंत्री लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
गांधी जयंतीचे औचित्य साधून परिसरात रक्तदान शिबीर व स्वछता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच काळेवाडी व तापकीर नगर परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याकरिता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष मछिंद्र तापकीर, मा. नगरसेविका अनिता तापकीर, संस्थेचे सचिव सागर तापकीर, माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य वाखरे सर, एल.बी.टी. इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. वर्षा मॅडम व शिक्षक, शिक्षिका तसेच पालक व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन वाखरे सर यांनी तर सूत्रसंचालन बापु बल्लाळ सर यांनी केले.