न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ मार्च २०२६) :- उन्हाळा जवळ येत असताना संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी महापौर रवि लांडगे यांनी महापालिका आयुक्तांना तातडीने सर्वंकष उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. वाढती पाण्याची मागणी, घटती भूजल पातळी आणि उपलब्ध जलसाठा लक्षात घेऊन नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे.
महापौरांनी ‘समर अॅक्शन प्लॅन’ तयार करून प्रत्येक विभागाला स्पष्ट जबाबदाऱ्या देण्याच्या सूचना केल्या. जलवाहिन्यांतील गळती दुरुस्ती, अनधिकृत नळजोडणी व पाणीचोरीवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
टंचाईग्रस्त भागांची यादी तयार करून टँकर व्यवस्था सज्ज ठेवणे, तसेच बोअरवेल व पूरक जलस्रोत कार्यान्वित ठेवण्यावरही भर देण्यात आला आहे.
“नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असून कोणतीही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही,” असे महापौरांनी स्पष्ट केले.








