- मोफत आरोग्य शिबिराचा ४०० नागरिकांनी घेतला लाभ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ ऑगस्ट २०२६) :- चऱ्होली, १७ ऑगस्ट २०२६ : भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्राइड वर्ल्ड सिटी, चऱ्होली येथे ‘प्राइड वर्ल्ड सिटी वेलिंग्टन सीनियर सिटीजन फोरम’ची स्थापना करण्यात आली. फोरमचे उद्घाटन प्राइड वर्ल्ड सिटीचे चेअरमन अरविंद जैन, माजी महापौर व नगरसेवक नितीन काळजे, नगरसेवक सचिन तापकीर तसेच दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी फोरमतर्फे आयोजित मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिराचा सुमारे ४०० नागरिकांनी लाभ घेतला. कार्यक्रमात फोरमच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. अध्यक्षपदी कैलास पंढरीनाथ नेवासकर, उपाध्यक्षपदी मदन मोहन मिश्रा व यशश्री कसरेकर, तर जनरल सेक्रेटरीपदी डॉ. दिलीप शेटे यांची निवड झाली. कार्यक्रमाचे आयोजन वेलिंग्टन सांस्कृतिक समितीने केले.


















