न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरातील खानदेशवासीयांचा तिसरा ‘खान्देश सार्वजनिक कानबाई माता उत्सव २०२६’ २२ ते २४ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाच्या तयारीसाठी शिवनगरी येथील तुळजाभवानी मंदिरात बैठक झाली.
२२ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता सप्ताह पूजन होणार आहे. २३ ऑगस्टला दुपारी २ ते ७ या वेळेत तुळजाभवानी मंदिर ते शुभम गार्डन, वाल्हेकरवाडी अशी कानबाई मातेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. शिरपूरचा गोल्डन बँड व अमळनेरचा राधेकृष्णा बँड आकर्षण ठरणार आहे. त्यानंतर देवी स्थापना, पूजन, महाप्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रम होईल.
२४ ऑगस्टला सकाळी ८ वाजता शुभम गार्डन ते जाधव घाट, रावेत विसर्जन मिरवणूक निघणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक नामदेव ढाके यांनी दिली.


















