- स्वीकृत सदस्य नियुक्ती, आरोग्य समिती, विकास योजना व प्रकल्पांच्या मंजुरीचा प्रस्ताव…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १९ एप्रिल २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सोमवार (दि. २०) रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडणार असून, विविध प्रशासकीय व विकासकामांशी संबंधित काही महत्त्वाचे विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले आहेत. या सभेत शहर विकास, आरोग्य, पर्यावरण, कर रचना आणि गृहनिर्माणाशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.
तब्बल १० नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव…
महानगरपालिकेवर महाराष्ट्र महानगरपालिका नियम २०१२ नुसार १० नामनिर्देशित सदस्य नियुक्त करण्याचा प्रस्ताव सभेपुढे ठेवण्यात आला आहे. भाजप व अपक्ष आघाडी – ७ सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस – ३ सदस्य. तौलनिक संख्याबळानुसार नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
नियोजन समितीत ३ सदस्यांची नियुक्ती…
महापालिकेच्या प्रारूप विकास योजनेसाठी तज्ञ सदस्यांसह नियोजन समिती गठीत करण्याचा प्रस्ताव आहे. शासन नियुक्त ४ तज्ञ सदस्यांचा समावेश. स्थायी समितीतील ३ सदस्यांची नियुक्ती प्रस्तावित. यामुळे विकास आराखड्यावरील निर्णय प्रक्रिया गतीमान होणार आहे.
यशवंतराव चव्हाण स्मारक समितीस अनुदान…
स्मारक समितीस पूर्वी दिलेल्या अनुदानानंतर पुन्हा मदत मागितली आहे. हमीपत्रातून सूट देऊन १ कोटी रुपयांचे अनुदान देण्याची शिफारस. सौरऊर्जा प्रकल्प व सुविधा उभारणीसाठी निधीचा वापर होणार आहे.
मालमत्ता कर विभागांची पुनर्रचना..
महापालिकेच्या उत्पन्नवाढीच्या दृष्टीने ‘अ’ व ‘ब’ विभागांची पुनर्रचना प्रस्तावित आहे. शहरातील वाढता विकास लक्षात घेऊन नव्याने विभागणी निवासी, व्यावसायिक व औद्योगिक मालमत्तांसाठी बदल लागू
प्रकल्पग्रस्तांना घरांचे वाटप (HDH योजना)…
बेघरांसाठी घरे (HDH) प्रकल्पांतर्गत १६१ सदनिकांचे वाटप प्रस्तावित. प्रति घर किंमत अंदाजे ₹११.०१ लाख. नागरिकांना सवलतीच्या दरात घरे देण्याचा विषय.
वृक्षप्राधिकरण अंदाजपत्रकास मान्यता…
सन २०२६-२७ साठी वृक्षप्राधिकरणाचे ₹८१.११ कोटींचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी ठेवले आहे झाडांचे संवर्धन व हरित उपक्रमांना चालना मिळणार आहे.
आरोग्य व वैद्यकीय समिती स्थापनेचा विषय…
शहरातील वाढत्या आरोग्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर नवीन ‘आरोग्य व वैद्यकीय समिती’ स्थापन करण्याचा प्रस्ताव. नागरिकांच्या आरोग्य सेवेत सुधारणा अपेक्षित.
किवळे येथील कचरा केंद्र स्थलांतराचा प्रस्ताव…
किवळे परिसरातील कचरा वाहतूक केंद्रामुळे दुर्गंधी, प्रदूषण व रोगांचा धोका. देहूरोड अॅम्युनेशन डेपोमुळे सुरक्षेचा प्रश्न. केंद्राचे अन्य ठिकाणी स्थलांतर. जागेवर अग्निशमन केंद्र किंवा बॅडमिंटन हॉल उभारणीचा प्रस्ताव.









