न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी :- आकुर्डी परिसरातील नामांकित विधिज्ञ व पिंपरी-चिंचवड अडव्होकेट बार असोसिएशनचे मा. अध्यक्ष विलास कुटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुटे यांना सर्वप्रथम त्यांच्या सौ. जयश्री कुटे यांनी औक्षण केले.
कुटे दाम्पत्यांनी आकुर्डीतील प्रसिध्द विठ्ठल मंदिरात अभिषेक व पूजा करून विठ्ठलाचे आशीर्वाद घेतले व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या आरोग्याकरीता विठ्ठलास साकडे घातले. यावेळी विलास कुटे यांना शुभेच्छ्या देण्याकरिता त्यांचे नातेवाईक, मित्र व आप्तेष्टांनी त्यांच्या निवासस्थानी व कार्यालय परिसरात गर्दी केली होती.
यावेळी पिंपरी-चिंचवड अडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीने विलास कुटे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्ष आर. के. पुणेकर, आतिश लांडगे, सुनील कड, सुहास पडवळ व आदी विधिज्ञ, सहकारी व कर्मचारी उपस्थित होते.