न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०१९) :- महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालयावरील हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवार (दि. १३) रोजी सर्वपक्षीय नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त आर. के. पज्ञनाभान यांची भेट घेतली. तसेच हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करावे तसेच, साने कुटुंबियांना संरक्षण दयावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक अजित गव्हाणे, नाना काटे, पंकज भालेकर, निलेश बारणे, शाम लांडे, प्रवीण भालेकर, नगरसेविका वैशाली काळभोर, सुमन पवळे, पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, सुलक्षणा धर, भाजप नगरसेवक संजय नेवाळे, अपेक्षांचे गटनेते कैलास बारणे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, युवकाध्यक्ष विशाल वाकडकर, सरचिटणीस फजल शेख आदी उपस्थित होते.
महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालय तोडफोड प्रकरणाचा सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास सुरु आहे. मी स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष देत असून एक महिन्याच्या आत या प्रकरणाचा छडा लावला जाईल.
– पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन