न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०१९) :- देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे भाजपा नगरसेवक जिकी उर्फ विशाल खंडेलवाल यांच्यावर अज्ञाताकडून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे देहूरोड परिसरात खळबळ उडाली आहे.
खंडेलवाल यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार आज गुरुवार (दि. १३) रोजी सांयकाळी घडला आहे. घटनेची माहिती मिळताच देहरोड़ पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेनंतर मारेकरी फरार झाले असून, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरु केले आहे. घटनेचे कारण समजू शकले नाही.