न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 11 जून 2026) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयात कार्यरत असलेल्या लोंढे नामक बिट निरीक्षकास 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कारवाई एसीबीच्या पथकाने सापळा रचून केली असून, लाच स्वीकारताना संबंधित कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. कारवाईनंतर एसीबीकडून पंचनामा व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.
मात्र, या प्रकरणाबाबत एसीबीकडून अधिकृत माहिती किंवा प्रसिद्धीपत्रक अद्याप जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे लाचेची नेमकी रक्कम, तक्रारीचे स्वरूप आणि कारवाईचे तपशील अधिकृत पुष्टीनंतरच स्पष्ट होणार आहेत.
या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.
(अधिकृत माहिती प्राप्त होताच बातमी अद्ययावत करण्यात येईल.)














