- पुलाच्या पायऱ्यांवर तरुणाने गळफास घेत संपवले जीवन..
- अनुचित घटनेमुळे परिसरात उडाली खळबळ…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १२ जून २०२६) : चिंचवडच्या एम्पायर इस्टेट परिसरातील पादचारी पुलाच्या (फूटओव्हर ब्रिज) पायऱ्यांजवळ एका तरुणाने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी समोर आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित तरुण पुलाच्या पायऱ्यांजवळ गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसत असून घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाल्याचेही दिसून येते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा व पुढील कार्यवाही सुरू केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
सदर तरुणाची ओळख आणि त्याने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे एम्पायर इस्टेट परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.















