न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १७ जून २०२६) :- मोरवाडी येथील न्याय संकुलात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेल्या बी. डी. कुलकर्णी आणि के. डी. शिरभाते यांनी बुधवार (दि. १७ जून २०२६) रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश नायर यांच्या उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा पार पडला.
या नियुक्त्यांमुळे मोरवाडी न्याय संकुलात आता एकूण तीन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालये तसेच एक दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय कार्यरत झाले आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाजाला अधिक गती मिळणार असून प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्यास चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच नागरिकांना अधिक जलद, प्रभावी आणि सुलभ न्याय मिळण्यास मदत होणार आहे.
यावेळी पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने दोन्ही न्यायाधीशांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, उपाध्यक्ष ॲड. अनिल पवार, सदस्य ॲड. मंगेश खराबे, ॲड. भारती पुरोहित, ॲड. विपुल शेटीया तसेच ॲड. शिवम कुंभार उपस्थित होते.















