न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १८ जून २०२६) :- रावेत येथील मस्के वस्ती येथील एका स्पा सेंटरमध्ये परवानगीशिवाय प्रवेश करून व्हिडीओ चित्रीकरण करत स्पा चालकाकडे खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी रावेत पोलिसांनी एका महिलेसह विष्णू सुरवसे आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्पा सेंटरचे व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत चालकाकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी ५ हजार रुपये रोख स्वरूपात घेतल्याचा आरोप आहे. तसेच स्पामध्ये आलेल्या एका ग्राहकाकडूनही व्हिडीओ व्हायरल न करण्यासाठी ५,५०० रुपये उकळल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रावेत पोलीस अधिक तपास करत आहेत.















