न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १८ जून २०२६) :- भोसरीतील यशोमंदीर सहकारी पतपेढीची तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी आधीच इतर बँका व पतसंस्थांकडे गहाण असलेली मालमत्ता लपवून पतसंस्थेकडून ४० लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यासाठी चुकीचे सर्च अँड टायटल अहवाल, अपूर्ण कागदपत्रे तसेच कथित बनावट दस्तऐवजांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे.
कर्जाची परतफेड न करता पतसंस्थेची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. भोसरी पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.















