- शत्रुघ्न काटे यांच्या पुढाकाराने सत्कार; वैभव बाकलीवाल यांचे करिअर मार्गदर्शन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०५ जुलै २०२६) :- भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या वतीने पिंपळे सौदागर व रहाटणी परिसरातील इयत्ता १० वी व १२ वी (SSC, HSC, CBSE, ICSE) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि ‘क्रिटिकल डिसिजन मेकिंग सेमिनार २०२६’ हॉटेल गोविंद गार्डन येथील बासुरी बँक्वेट हॉलमध्ये उत्साहात पार पडला.
देशपातळीवरील प्रसिद्ध बाकलीवाल ट्युटोरियल्सचे संचालक व आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी वैभव बाकलीवाल यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवड, उच्च शिक्षणाच्या संधी आणि योग्य निर्णयक्षमतेबाबत मार्गदर्शन केले. प्रत्येक बोर्डातील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांना सायकल, करंडक, सन्मानपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सॅक, वह्या, पेन आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या कष्टाचे कौतुक करून त्यांच्या भविष्यातील वाटचालीला दिशा देणे हेच आमचे कर्तव्य असल्याचे शत्रुघ्न काटे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, मान्यवर, पालक आणि शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.
















