- अपघाताला आयतेच निमंत्रण..
- महापालिका प्रशासन लक्ष देणार का?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी-तळवडे (दि. 17 नोव्हेंबर 2026) :- निगडी-तळवडे मार्गावर ज्योतिबानगर येथे वाहतूक सिग्नलचा खांब धोकादायक अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे.
सिग्नलचा खांब एका बाजूला झुकलेल्या अवस्थेत असून, त्याचा काही भाग रस्त्याच्या दिशेने लोंबकळत असल्याचे दिसत आहे.
या ठिकाणाहून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत हा खांब कोसळल्यास वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. सुदैवाने, मोठा अपघात होण्यापूर्वीच या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे.
महापालिका प्रशासनाने या ठिकाणाची तातडीने पाहणी करून धोकादायक अवस्थेतील सिग्नलचा खांब दुरुस्त करावा किंवा सुरक्षितपणे हटवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

















