न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २६ नोव्हेंबर २०२६) :- आम आदमी पार्टीचा वर्धापन दिन आणि संविधान दिनानिमित्त पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमात माजी राष्ट्रवादी युवक सरचिटणीस सनी काळे आणि शिवसेना शाखाप्रमुख प्रदीप आहुजा यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी अशोक लांडगे, चंद्रमणी जावळे, सुरेश बावनकर, ॲड. सुप्रिया गायकवाड, सुनंदा दुधाळ, शितल जेवळे, राहुल मदने, शिवकुमार बनसोडे, सनी काळे, प्रदीप बनसोडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















