न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा आज गुरुवार (दि. २०) रोजी महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करणेत आली होती. महापौर राहूल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
सत्ताधारी भाजपने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर अभियंता पदावर राजन पाटील यांना पदोन्नती देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत उपसूचनेव्दारे मंजूर केला. यावरून राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेविका मंगल कदम यांनी आक्रमक होत, उपसूचनेद्वारे पदोन्नतीला विरोध करीत उपसूचना रद्द करण्याची मागणी केली. तसेच, आयुक्त व नगरसचिव यांनी खुलासा करण्याची मागणी केली.
पक्षनेते एकनाथ पवार व नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी राष्ट्रवादीला लक्ष करत उपसूचनेसह प्रस्ताव मंजूर करण्याची सूचना केली. महापौर राहूल जाधव यांनी या विषयाला माजी महापौर मंगला कदम यांचा आक्षेप असताना हा विषय मंजूर केला. यावरून राष्ट्रवादीचे नगरसेवक यांनी सत्ताधारी नियमबाह्य पध्दतीने प्रस्ताव मंजूर करीत असून, यात भाजप पदाधिकाऱ्यांचेही हात ओले असल्याचा आरोप केला. या घटनेचा निषेध करीत विरोधी पक्षनेते साने व कदम यांनी तसेच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभात्याग करीत सभागृहातून काढता पाय घेतला.


















