न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०१९) :- पिंपरी चिंचवड शहराचे माजी उपमहापौर शेषाप्पा चंद्रप्पा नाटेकर (वय ६८ वर्ष) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज (गुरुवारी) थेरगाव येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.
शेषाप्पा नाटेकर हे १९९२ साली पहिल्यांदा अपक्ष नगरसेवक म्हणून महापालिकेत निवडून आले होते. त्यानंतर पहिल्याच वर्षी उपमहापौरपद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला होता.
त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सहा विवाहित मुली, सुना, जावई, नातू, पणतू असा परिवार आहे. माजी नगरसेविका सुखदेवी नाटेकर यांचे ते वडील होत. त्यांचा अंत्यविधी उद्या (शुक्रवारी) सकाळी ११ वाजता अॅटोक्लस्टर शेजारील स्मशानभूमित होणार आहे.















