न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २१ जून २०१९) :- औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात दि. २१ जून २०१९ रोजी सकाळी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात आला.
यानिमित्त योग प्रशिक्षक म्हणून गणेश कालापुरे, हर्षदा देशपांडे, सहकारी प्रशिक्षक प्रदीप खोले यांनी प्रात्यक्षिकासह योगा प्रशिक्षण दिले. तसेच विविध आसनांचे आरोग्याशी असणारे महत्त्व सांगितले. या योगा दिनानिमित्त महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे, उपप्राचार्य डॉ.विलास सदाफळ, क्रीडासंचालक प्रा.बी.एस.पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुप्रिया पवार, ग्रंथपाल एकनाथ झावरे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अतुल चौरे, आय.क़्यु.ए.सी. चेअरमन डॉ.सविता पाटील तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक -शिक्षेकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी व औंध परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.
आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे यांनी योगाचे जीवनातील महत्त्व विषद करून, आरोग्यदाई जीवन जगायचे असेल तर केवळ २१ जून रोजीच योगासने न करता महाविद्यालयात प्रत्येक शनिवारी योगवर्ग चालविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केले. तसेच स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवायचे असेल तर भारतामधील योगाची परंपरा जोपासणे आवश्यक आहे. योग साधनेद्वारे महाविद्यालयात आरोग्यदाई वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षेकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी व औंध परिसरातील नागरिकांनी उस्पुर्त सहभाग घेतला.











