न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ प्रतिनिधी :- गुरुवार दि. ४. ऑक्टो रोजी मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, वडगाव नगरपंचायतीच्या कला, सांस्कृतिक व शिक्षण समितीच्या सभापती पुजा विशाल वहिले व आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापती सायली रुपेश म्हाळसकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी संघाचे राज्य संपर्कप्रमुख सुहास विटे, राज्य उपाध्यक्ष बा.ल.औटी, तालुका नेत्या शोभाताई वहिले, अध्यक्ष चिमाजी वाळुंज, अध्यक्षा सुरेखा औटी, चेअरमन नारायण कांबळे, अनिल कळसकर, कार्याध्यक्ष बजरंग लोहकरे, सरचिटणीस दत्तात्रय भालेराव, कोषाध्यक्ष विनायक पारखे, प्रसिद्धीप्रमुख सुरेश गोडसे, विष्णू मोरे, संदिप औटी, दिपक मेमाणे, रामदास काठे, गंगासेन वाघमारे, रामेश्वर पवार, रोहिदास आवारी, आनंदा गोंदके, गौतम जुगदार, संचालिका कल्याणी रासकर, तृप्ती गाडीलकर, शमा शेख, सुलोचना साबळे, सुषमा घोरपडे, भाग्यश्री विटे, राजश्री घोरपडे, छाया जाधव, सुरेखा मराठे, पंचशीला सोनकांबळे यांच्यासह जिल्हा संपर्कप्रमुख राजू भेगडे, संचालक मुकुंद तनपुरे, तानाजी शिंदे, मनोज भांगरे, भरत शेटे आदी उपस्थित होते.












