- रयत स्वाभिमानी संघटनेच्या पाठपुराव्याला यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे, दि. १० ऑक्टोबर २०२६ : सुसगाव येथील सर्वे क्रमांक १२७ मधील विविध भूखंडांवर विनापरवाना रस्ते खोदाई केल्याप्रकरणी पुणे महापालिकेच्या पथ विभागाने तीर्थ डेव्हलपर्सला ६ कोटी ४३ लाख ७३ हजार ७६० रुपयांचा दंड आकारला आहे.
रयत स्वाभिमानी संघटनेचे संघटक ऋषिकेश कानवटे यांच्या पाठपुराव्याला यश आल्याचा दावा संघटनेने केला आहे.
यापूर्वीही ९५ लाखांचा दंड आकारण्यात आल्याचे कानवटे यांनी सांगितले. दंडाची तातडीने वसुली करावी, अन्यथा पुण्यातील संबंधित बांधकामांना कामबंद नोटीस द्यावी, अशी मागणी शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अन्य बांधकामांतील विनापरवाना विद्युत केबल टाकण्याच्या प्रकारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.


















