न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सांगवी, दि. ११ ऑक्टोबर २०२६ :- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सांगवी येथे ‘बीइंग होलीएंटर’ (Being Volunteer) संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कापडी पिशवीवर रंगकाम स्पर्धा आयोजित करण्यात आली.
इयत्ता पाचवी ते नववीतील १६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत पर्यावरण जनजागृती, प्लास्टिकमुक्त भारत आणि ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’चा संदेश दिला. कापडी पिशव्या व रंगसाहित्य संस्थेतर्फे मोफत देण्यात आले.
समन्वयक निलम नागुल, व्यवस्थापक मानसी गोखले, मीडिया डिझायनर शामल कोळी, वित्त विभागप्रमुख मनीषा सावंत, अंजली देशमुख, इंद्राणी शोंगे आणि जान्हवी दवंडे यांनी सहकार्य केले. प्राचार्य अजिनाथ ओगले, उपप्राचार्या मेघा पोटे, पर्यवेक्षक चंद्रशेखर वाघमारे, शिक्षक व स्वयंसेवकांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम यशस्वी झाला.


















