- “विद्यार्थी गुणगौरव व करीअर मार्गदर्शनाने शिवसेना वर्धापनदिन उत्साहात साजरा”
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०१९) :- विद्यार्थ्यांच्या आवडी नुसार त्यांना त्यांचे करीअर क्षेत्राची निवड करू द्या. पालकांनी आपल्या अपेक्षाचे ओझे मुलांवर लादू नये. विद्यार्थी यांनीसुद्धा जिद्द व चिकाटी ठेवुन आपले लक्ष साध्य करावे. आपल्या जिवनातील स्वप्नाना कष्टाचे बळ द्या, असे आवाहन भारतीय कामगार सेना उपाध्यक्ष इरफान सय्यद यांनी भोसरी येथे केले.
शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने शिवसेना भोसरी विधानसभा व महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्या वतीने कामगार नेते इरफानभाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ति फॉर्म चे वाटप व करीअर मार्गदर्शन यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढाळराव पाटील उपस्थित होते .
शिवसेना उपनेतेपदी शिवाजी आढाळराव पाटील यांची निवड झाल्याबद्दल भोसरी विधानसभा व पिंपरी चिंचवड शहर शिवसेना यांच्या वतीने मावळा पगडी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थी यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय कामगार सेना महासंघाचे उपाध्यक्ष इरफान सय्यद, पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, शिवसेना जिल्हा प्रमुख राम गावडे, जिल्हा उपाध्यक्ष अरूण गिरे, जुन्नर तालुका प्रमुख माऊली खंडागळे, उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, शहरप्रमुख योगेश बाबर, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, धनंजय आल्हाट, शहर संघटीका उर्मिला काळभोर, उपशहरप्रमुख आबा लांडगे, नेताजी काशीद, युवराज कोकाटे, सर्जेराव भोसले, दत्तात्रय भालेराव, राहुल गवळी, परशुराम आल्हाट, युवासेनेचे सुरज लांडगे, सचिन सानप आदी उपस्थित होते.

यावेळी भोसरी विधानसभा मतदार संघातील जेष्ठ शिवसैनिक महादेव गव्हाणे, बाजिराव लांडे, कैलास नेवासकर, दिलीप सावंत, शरद हूले, रमेश गुंड, संदिप टोके, शिवाजी दोडके, काळुराम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
दहावी व बारावी नंतर काय? याबाबत उपस्थित विद्यार्थी, पालक यांना प्रा. विलास वाळके व अॅड रोहित आकोलकर यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांची पुढील दिशा ठरवण्याची जबाबदारी संस्था, विद्यार्थी, पालक या तिघांचीही आहे. शैक्षणिक क्षेत्रात पुढील प्रवेशाची प्रक्रिया समजून घ्या. प्रत्येक क्षेत्रात संधी आहे ती शोधात आली पाहिजे. त्यातून योग्य ते क्षेत्र निवडलं पाहिजे. वडिलांचे स्वप्न व तुमची महत्वकांक्षा यांची सांगड तुम्हाला घालता आली पाहिजे. मोबाईल इंटरनेटचा वापर आपल्या शैक्षणिक प्रगती साठी करा. आपल्यातील आत्मविश्वास जागृत करून कष्ट करा, योग्य ती संधी आपल्या पुढ्यात चालत येईल, असे मार्गदर्शन विद्यार्थी यांना करण्यात आले.
शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले आता स्पर्धा खुप वाढली आहे. आपल्या मुलांचे करिअर आपल्या हातात आहे. पालकांनी विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव आणू नये त्यांच्या कलेने घ्यावे.
कामगार नेते इरफानभाई सय्यद यांनी उपस्थित पालकांना व विद्यार्थी यांना आवाहन करीत म्हणाले की, विद्यार्थ्यांना कोणत्याही गोष्टीची माहिती हवी असल्यास किंवा कोणतीही अडचण आल्यास महाराष्ट्र मजदूर संघटना कार्यालयाचे दार उघडे आहे. तुमचा हा भाऊ तुमच्या पाठीशी कायम मदतीसाठी तत्पर आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही गोष्टींची आवश्यकता भासल्यास महाराष्ट्र मजदूर संघटनेचे प्रवेशद्वार तुमच्यासाठी सताड उघडे राहील, असे आश्वासन देत गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या.


















