न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०१९) :- सध्या संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेमध्ये आहे. आषाढ़ी वारी निमित्त संपूर्ण महाराष्ट्राच्या कनाकोपऱ्यातुन संत महतांच्या पालख्या पंढरपुराकडे रवाना होत असतात. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. ३५० पेक्षा जास्त दिंड्या ह्या पालखी वारी सोहळ्यात सहभागी होत असतात. ३३० वर्षापासून विठ्ठल भक्तीची परंपरा वैष्णवांनी श्रद्धेने जपली आहे. ४ ते ५ लाख भाविक दरवर्षी ह्या सोहळ्यास देहू आणि आळंदी येथे सहभागी होत असतात. परंतु, दुष्काळी परस्थितीमुळे यंदाच्या वर्षी वारकरयांची संख्या निम्म्याने घटली आहे. फार मोठे जलसंकट उभे राहिले आहे. पर्यावरण पूरक जीवनशैलीचा ऱ्हास झाल्यामुळे तसेच वृक्षसंपदा नष्ट झाल्यामुळे पर्जन्यवृष्टीवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे दुष्काळाची अभुतपूर्व परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. याकरिता यंदाची वारीमध्ये ”हरित वारी उपक्रम” प्राधिकरण नागरी सुरक्षा समिती, पिंपरी चिंचवड शहर आयुक्तालय व जैन सोशल ग्रुप डायमंड यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.
दोन दिवसांपासून देहू परिसरात, तसेच देहूरोड पोलीस ठाणे परिसरात १६० वृक्षांचे रोपन करण्यात आले. यंदाच्या वर्षी ५०१ वड, पिंपळ,कडुलिंब, ह्या देशी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. ह्यामुळे १०० टक्के ऑक्सिजन निर्मितीस देहू परिसरामध्ये बळ मिळेल. पोलीस कर्मचारयांचा मोठा सहभाग ह्या पर्यावरण पूरक हरितवारी मध्ये देहू परिसरात प्रथमच नोंदला गेला.
आजच्या हरित वारी उपक्रमामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते, व. पो. निरीक्षक मनीष कल्याणकर, वाहतूक पोलीस निरीक्षक दिलीप भोसले, सहायक पोलिस निरीक्षक शाहिद सय्यद पठाण, अर्जुन पवार, पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार आणि संतोष येडे, पोलीस कर्मचारी अशोक नवले, वैशाली लोखंडे, जैन सोशल ग्रुप चे विजय मुनोत, संतोष छाजेड प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, महिला अध्यक्ष अर्चना घाळी दाभोळकर, संतोष चव्हाण, बाबासाहेब घाळी, संदीप सकपाळ, अँड विद्या शिंदे, राम सुर्वे, अमोल कानु, अमित डांगे, जयेंद्र मकवाना, देवयानी पाटील, कविता बोण्डे, विभावरी इंगळे, गौरी सरोदे, तेजस सापरिया, नितीन मांडवे, मंगेश घाग, मौसमी घाळी, मदन जोशी, विशाल शेवाळे, बळीराम शेवतें, विजय जगताप, उमेश कांगुडे, कुलदीप डांगे, नाना कुंबरे, शीतल धामापूरकर यांनी सहभाग घेतला.
या प्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते म्हणाले,”हरित वारी उपक्रमामुळे पर्यावरण शुद्धिबरोबर हरिनामामुळे आत्मशुद्धी सुद्धा होणार आहे. महाराष्ट्राच्या दुष्काळावर मात करायची असेल तर, वृक्ष लागवड करणे अत्यन्त गरजेचे आहे.”













