बसचा दरवाजा उघडा असताना बसला धक्का; ब्रेक मारताच महिला पडली
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी दि. १६ नोहेंबर २०२६) :- दिघी परिसरातील वडमुखवाडी येथील थोरल्या पादुका बंधारा येथे पीएमटी बसमधून पडून एक महिला जखमी झाल्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमटी बस क्रमांक एमएच १२ एक्सएम ६०३५ ही बस थोरल्या पादुका बंधारा, वडमुखवाडी येथून जात असताना बसचा दरवाजा उघडा होता. यावेळी बसचालकाने भरधाव वेगात बस चालविल्याने तसेच अचानक ब्रेक मारल्याने महिला बसच्या दरवाजातून खाली पडली. या घटनेत महिलेला दुखापत झाली.
याप्रकरणी १५ नोव्हेंबर रोजी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुसळे करीत आहेत.


















