- पाठीमागून धडक देत चालक घटनास्थळावरून पसार; निगडी पोलिसांत गुन्हा दाखल
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. १६ नोहेंबर २०२६) :- झेप्टो कंपनीची डिलिव्हरी करण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या तरुणाला भरधाव कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना निगडी ते पुणे ग्रेट सेपरेटर मार्गावर आकुर्डी येथे घडली. या अपघातात दुचाकीस्वार अंकित गंभीर जखमी झाला असून, दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अंकित हा स्प्लेंडर दुचाकीवरून निगडी येथून पिंपरीच्या दिशेने झेप्टो डिलिव्हरीसाठी जात होता. त्याचवेळी कंटेनर चालक प्रदीप कुमार याने वाहन रहदारीच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे पाठीमागे घेतले. यावेळी कंटेनरची अंकितच्या दुचाकीला जोरदार धडक बसली.
या अपघातात अंकित गंभीर जखमी झाला. धडक दिल्यानंतर कंटेनर चालकाने जखमीला वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी अंकितचे वडील अशोक मगर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर चालक प्रदीप कुमार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुटे करीत आहेत.

















