न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जून २०१९) :- व्याजाच्या पैशांसाठी खासगी सावकाराने तरुणाचे अपहरण केले. तरुणाला एका गॅरेजमध्ये डांबून ठेवले. तसेच त्याला पोत्यात घालून बेदम मारहाणही करण्यात आली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना रविवारी (दि. २३) रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास रहाटणी येथे घडली.
याप्रकरणी संकेत किशोर राका (२८, रा. अलंकापुरम सोसा. च-होली) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रामदास गोडांबे, सुमित सोमवंशी, पवन मंडलिक, शुभम कवठे, धनंजय कोकणे, कुणाल थोपटे, राजू वहिरे यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने यांनी दिली.











