न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुखांचे पखवाज भेट देऊन स्वागत केले जाणार आहे. ही भेटवस्तू नगरसेवकांच्या मानधनातून खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेची भेटवस्तू देऊन हजार गौरव करण्याची जुनी परंपरा कायम राहणार आहे.
महापौर राहुल जाधव यांनी पुढाकार घेऊन आळंदी, पाथर्डी या ठिकाणाहून प्रत्येकी १५० आणि पंढरपूर येथून ४४३ पखवाज असे एकूण ७४३ पखवाज नुकतेच खरेदी करण्यात आले आहेत. पखवाजाची किंमत साधारण ३ हजार ३०० रुपये आहे. त्याचा एकूण खर्च सुमारे २४ लाख ५१ हजार ९०० रुपये आहे.
हा खर्च नगरसेवकांच्या मानधनातून करण्यात आला आहे. निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प या चौकात जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुखांना मंगळवारी (दि. २४) रोजी भोसरीतील दिघी मॅगझीन चौकात संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्यातील दिंडीप्रमुखांना बुधवारी (दि. २५) रोजी पखवाज भेट दिले जाणार आहेत.











