न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०१९) :- पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व नुकतेच मावळचे आमदार बाळा भेगडे यांची कामगार, पर्यावरण आणि मदत पुनर्वसन राज्यमंत्री म्हणून फडणवीस मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. हे दोघेही निवडीनंतर प्रथमच पिंपरी चिंचवड शहरात येत आहेत.
भाजपच्या मोरवाडी येथील कार्यालयात सकाळी दहा वाजता शहर भाजपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर दोघे महापालिकेतील पदाधिकारी आणि पक्ष संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत.











