- चिंचवड, भोसरी आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी संधी..
- प्रत्येक नगरसेवकाला मिळणार १५ महिन्यांचा कालावधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २० नोव्हेंबर २०२६) :– पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या सात स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा महापौर रवी लांडगे यांनी शुक्रवारी (दि. २०) पत्रकार परिषदेत केली. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून तीन, भोसरीतून दोन आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातून दोन जणांना संधी देण्यात आली आहे. प्रत्येक स्वीकृत नगरसेवकाला १५ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.
यावेळी पक्षनेते प्रशांत शितोळे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, उपमहापौर शर्मिला बाबर आदी उपस्थित होते.
भाजपच्या सात स्वीकृत नगरसेवकांची नावे :
चिंचवड विधानसभा १. सचिन साठे २. जयनाथ काटे ३. विशाल कलाटे
भोसरी विधानसभा ४. ऋषिकेश म्हेत्रे ५. कुलदीप परांडे
पिंपरी विधानसभा ६. राजेश पिल्ले ७. कुणाल लांडगे
दरम्यान, नावांची घोषणा झाली असली तरी अधिकृत प्रक्रियेला अद्याप अवधी लागणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मिळून एकूण दहा नावे विशेष सभेत जाहीर करण्यात येतील, अशी माहिती पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी दिली. त्यामुळे आता विशेष सभेतील अधिकृत घोषणेकडे लक्ष लागले आहे.

















