न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०१९) :- छत्रपती शाहू महाराजांनी सर्व जाती धर्मांचा विचार करून सामाजिक क्रांती घडवून आणली आणि समाज व्यवस्थेला चांगली दिशा मिळाली असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे शाहूनगर येथील कै. सदाशिव बहिरवाडे क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, त्याचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, अण्णाभाऊ आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, क्रीडा,कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती तुषार हिंगे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसेवक केशव घोळवे, नगरसेविका मंगला कदम, अनुराधा गोरखे, कमल घोलप, माजी नगरसेवक मारुती भापकर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, शाहीर प्रकाश ढवळे, कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे पांडुरंग पाटील, पी.बी.पाटील, जगदीश परीट, कुशाग्र कदम, कृष्णा पाटील, मिलिंद वेल्हाळ, सुनिल पाटील, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले व प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
कोल्हापूर येथील प्रसिद्ध शाहीर रंगराव पाटील यांनी छत्रपती शाहू महाराजांवरील शाहिरी सादर करून उपस्थितांची मने जिंकली तर ख्यातनाम सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर निर्मित राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित अग्निदिव्य हे नाटक सादर करण्यात आले.













