न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त महापालिकामुख्य प्रशासकिय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस तसेच निगडी येथील त्यांच्या पुतळयास महापौर राहूल जाधव व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरीयांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आज सकाळी महापालिकेच्या मुख्य प्रशासकिय इमारतीमध्ये झालेल्या कार्यक्रमास मनसे गटनेते सचिन चिखले, विधी समिती सभापती अश्विनी बोबडे अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, नगरसदस्या कमल घोलप, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती अध्यक्ष सतिश भवाळ, मुख्यलेखा परिक्षक अमोद कुंभोजकर, आरोग्य वैदयकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, सामाजिक कार्यकर्ते युवराज दाखले, राहूल शिंपी आदी उपस्थित होते.
निगडी येथे झालेल्या या कार्यक्रमास, मनसे गटनेते सचिन चिखले, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, नगरसदस्या
कमल घोलप, नगरसदस्य उत्तम केंदळे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य मनोज तोरडमल, सतिश भवाळ, सामाजिक कार्यकर्ते संदिपान झोंबाडे, सुनिल भिसे, संजय ससाणे, नितिन घोलप, प्रा.धनंजय भिसे, अरुण जोगदंड, दशरथ कसबे, कैलास पाटोळे, विकास भवाळ, माहिती व जनसंपर्क विभागाचे मुख्य लिपीक रमेश भोसले आदी उपस्थित होते.















