न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०१९) :- नव्याने विधी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या नवोदित वकिलांचे पोलीस व्हेरिफीकेशन / पडताळणी तात्काळ करून मिळवे, अशी मागणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पज्ञनाभन यांच्याकडे पिंपरी चिंचवड ॲड. बार असो. चे माजी अध्यक्ष ॲड. राजेश पुणेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी पिंपरी चिंचवड ॲड. बार असो. चे माजी अध्यक्ष ॲड. राजेश पुणेकर, ॲड. सुहास पडवळ, ॲड. गणेश शिंदे, ॲड. अतुल अडसरे, ॲड. अतिश लांडगे
आदी उपस्थित होते. तसेच नव्याने विधी अभ्यासक्रम पुर्ण केलेले नवोदित वकिल देखिल यावेळी उपस्थित होते.
ॲड. पुणेकर यांनी या निवेदनात म्हटले आहे की, ”पिंपरी चिंवड शहरामधुन दरवर्षी साधारण शंभर ते दोनशे विद्यार्थि विधि महाविद्यालयामधुन शिक्षण पुर्ण करून वकिली व्यवसाय चालु करत आहेत. सदर विद्यार्थांना शेवटचे वर्ष उत्तिर्ण झाल्यानंतर पोलीस व्हेरिफीकेशन / पडताळणी करणे बंधनकारक करणेत आले आहे. सदर बाब ही स्तुत्य असली तरी, सदर पोलीस व्हेरिफीकेशन / पडताळणीस बराच व अवास्तव वेळ लागत असुन नवोदित वकिलांना व नुकत्याच उत्तिर्ण झालेल्या विद्यार्थांना संबंधीत पोलीस स्टेशन व आयुक्त कार्यालयाचा अवास्तव पाठपुरावा करावा लागत आहे. सदर विद्यार्थ्यांनी / नवोदित वकिलांनी शिवाजीनगर न्यायालय व पिंपरी न्यायालयामध्ये कामाचे प्रशिक्षण चालु केले असल्याने सदर पोलीस व्हेरिफीकेशन / पडताळणी जलद गतीने होणे गरजेचे आहे. सदर पोलीस व्हेरिफीकेशन / पडताळणी जलद गतीने होणेकामी योग्य ते सहकार्य मिळावे व त्याबाबत संबंधीत कर्मचा-यास योग्य त्या सुचना देण्यात याव्यात, असे या निवेदनात पुणेकर यांनी म्हटले आहे.
आयुक्त आर. के. पज्ञनाभन यांनी पोलीस व्हेरिफीकेशन / पडताळणी ही काटेकोरपणे होत असल्याने वेळ लागत आहे. असे असले तरी पोलीस व्हेरिफीकेशन / पडताळणी तात्काळ करण्याच्या सूचना सबंधीताना देणार आहे, असे आश्वासन वकिलांच्या शिष्टमंडळास दिले.












