न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०१९) :- पुढील १५ दिवसांत शहरातील कचऱ्याची समस्या ही सुटलीच पाहिजे, शहर कचरा मुक्त, दुर्गंधी मुक्त झालेच पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळासह महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन केली आहे.
पिंपरीतील भाजी मंडई येथे पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पाटीच्या वतीने शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पिंपरीतील भाजी मंडई येथील कचरा साफ करण्यात आला, ठिक-ठिकाणी पाला-पाचोळा, कचऱ्याचे ढिग असल्याने ते साफ करण्यात आले. स्वच्छता मोहीम अभियानानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट पार्थ पवार व शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या शिष्टमंडळाने घेतली, त्यामध्ये शहरातली आठ ही क्षेत्रीय कार्यलयांमध्ये स्वच्छता ही दररोज झालीच पाहिजे, कचरा संकलित करणाऱ्या नवीन गाड्याची उंची जास्त असल्यामुळे त्यांची उंची कमी करण्यात यावी, जेणेकरून महिलांना कचरा टाकण्यास अडचण येणार नाही. प्रत्येक कचऱ्याच्या गाडीवर एक मदतणीस नियुक्त करावा, शहर हे कोणत्याही परिस्थितीत कचरा मुक्त झालंच पाहिजे.
एकेकाळी बेस्ट सिटीने सन्मानीत झालेल्या शहराची स्वच्छेतच्या बाबतीत जर ५२ वा क्रमांक जात असेल तर ही गंभीर बाब आहे. एकेकाळी महाराष्ट्र राज्य हे स्वच्छेतच्या बाबतीत राज्यात प्रथम क्रमांकावर होता व देशात नववा असताना आजची परिस्थिती ही कोणत्या कारणामुळे झाली आहे, हे सुज्ञ जनतेला माहीत आहे. सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार चालू आहे, असे मत पार्थ पवार यांनी मांडले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात प्रत्येक रविवारी स्वच्छछता मोहीम राबविण्यात येईल असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, राजू मिसाळ, प्रवक्ते फजल शेख, नगरसेविका उषाताई वाघेरे पाटील, निकिताताई कदम, गणेश भोंडवे, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे, युवा नेते ऋषीकेष वाघेरे पाटील, व्यापारी सेल अध्यक्ष प्रदीप गायकवाड, खजिनदार संजय लंके, सरचिटणीस अमोल भोईटे, महिला बचत गट महासंघ अध्यक्षा कविता खराडे इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.












