न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०१९) :- आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने पिस्तुलातून स्वतःच्या छातीवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी संध्याकाळी पिंपरीमध्ये घडली.
सचिन वांडेकर (वय- २८ रा. पिंपळे गुरव, मूळ आष्टी, जिल्हा बीड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो विमाननगर येथील आयटी कंपनीत कामाला होता. परंतु, त्याने तीन दिवसांपूर्वी काम सोडले असल्याचे सांगण्यात येत आहे.
तो लहान भाऊ आणि आणखी एका मित्रांसह पिंपळे गुरव येथे राहात होता. त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र त्याच्याकडे पिस्तुल आले कोठून? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.












