न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०१९) :- भारतीय जनतेत स्वराज्याची अस्मिता निर्माण करणारे व राष्ट्रवादाची जाणीव निर्माण करुन तरुणांमध्ये राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागृत करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त निगडी येथील त्यांच्या पुतळयास महापौर राहूल जाधव व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्य अमित गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्याधिकारी मारुती शिंदे, धोकोजी शिर्के आदि मान्यवर उपस्थित होते.















