न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०१९) :- राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत प्रशासकीय पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत क्षेत्रीय भेटीसाठी आलेल्या पुणे महानगर पालिकेच्या कर्मचा-यांचे शिष्टमंडळ पिंपरी चिंचवड महापालिका भेटीवर आज मंगळवार (दि. २३) रोजी आले होते.
याबाबत महापौर राहूल जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महापालिकेच्या विविध योजनांबाबत चर्चा केली. यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदि मान्यवर उपस्थित होते.















