न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने त्याजागी कोणाची वर्णी लागेल याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती.
अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, मावळते विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा राजीनामा मंजूर झाला असून, त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक नाना काटे यांची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी व गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
याबाबत राष्ट्रवादीच्या वतीने विरोधी पक्षनेतेपदी व पक्षाच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांच्या नावाचे विभागीय आयुक्तांकडे पत्र देण्यात आले आहे व त्यावर प्रशासनाकडून शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची दत्ता साने यांच्या रूपाने महापालिकेतील मुलुखमैदानी तोफ अखेर शांत झाली.











