न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जुलै २०१९) :- निगडी पोलिसांना ओटास्कीम येथे एकजण गांजा विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार परिसरात सापळा रचून मंटू चंद्रभूषण पासवान (वय ४६, रा. आझाद चौक, निगडी) याला अटक केली.
त्याच्याकडून १६ किलो ३०० ग्रॅम वजनाचा ३ लाख ४५ हजार ४५० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. मंटू याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.