न्युज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २७ जुलै २०१९) :- येथील एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर येथे कारगिल विजय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांनी मार्गदर्शन केले.
देशात शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी देशाच्या सीमेवर सैनिक अहोरात्र झटत असतात. त्यांचा सर्व भारतवासीयांना अभिमान वाटतो. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आजच्या तरुणांनी समाजातील अनिष्ट प्रथा परंपरांना बाजूला सारत सामाजिक बांधिलकी मानून कार्यरत राहिले पाहिजे असा मनोदय व्यक्त केला.
सदर कार्यक्रमात कारगिल युद्धात शाहिद झालेल्या शूर वीराना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले, प्राध्यापक, एन. सी. सी. कॅडेट, विद्यार्थी यांनी आदरांजली वाहिली.











