न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०१९) :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना काळेवाडी-रहाटणी विभागाच्या वतीने रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. शिवसेना शहरसंघटक हरेश आबा नखाते व सदस्या-जाणीव फाऊडशेन पिं.चिं. शहर सौ सुजाताताई हरेश नखाते आयोजन केले.
काळेवाडी-ज्योतिबानगर येथील ऑक्सिकेअर मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल व ओम बल्ड बॅक व डाॅ शेखर घाडगे, डाॅ प्रथम सांळुके यांच्या सहकार्याने (आश्विनी कॉलनी, पार्वती स्कुल रस्ता) येथे शनिवारी (दि. २७) सकाळी ९ वाजेपासुन शिबिराची सुरूवात करण्यात आली व दुपारी 3 वाजेपर्यत सुमारे ६० जणांनी रक्तदान केले. त्यामध्ये रक्त, लघवी, शुगर आदी तपासण्या मोफत करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरसंघटिका अॅड उर्मिलाताई काळभोर, एकनाथ मंजाळ, बाळासाहेब काळे, बाळासाहेब शिरसाट, संजय गायके, अर्जुन कांबळे, शंकर जाधव, लक्ष्मण टोणपे, नरसिंग माने दिलीप सुर्यवंशी लक्ष्मण सुर्यवंशी, राजु शिंदे, महंद्र गिरासे, नेताजी नखाते, आदिक भोसले, सिताराम राणे, रुस्तुम वायभट, सुधा नाईक, शारदा वाघमोडे, मुक्ता पवार, मिना वराट, चंद्रीका सांळुके, वंदना वायभट, सविता जाधव, वैशाली राऊत आदि उपस्थित होते.
या कार्यकम्रासाठी विभागप्रमुख गोरख पाटील, प्रदीपदादा दळवी, विभागसंघटक गणेशभाऊ वायभट, पै अंकुशभाऊ कोळेकर उपविभाप्रमुख अनिल पालांडे, मातोक्षी ग्रुपचे आध्यक्ष-गणेश आहेर, बाळासाहेब येडे, प्रजाक नढे, योगेश वायभट, आकाश शिरोळे, स्वत्निल कुंभार, भागवत वायभट, दादा घोडके यांनी परिश्रम घेतले.


















