न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०१९) :- राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदऋषीजी महाराजांच्या जीवनाचा ” बहुजन हिताय-बहुजन सुखाय” हा मूलमंत्र होता. त्यांनी सर्व मानव जातीला दुःखी, दरिद्री पीडित यांच्या सेवे ची शिकवण दिली, असे उदगार आनंदश्रमणी उपप्रवर्तीनी प. पु. श्री कंचन कंवरजी म. सा यांनी काढले.
आकुर्डी येथील जैन श्रावक संघ आकुर्डी-निगडी- प्राधिकरण च्या वतीने आयोजित केलेल्या चातुर्मास अंतर्गत राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदऋषीजी म सा यांच्या ११९ व्या जयंती सप्ताहाच्या प्रारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर आनंद श्रमणी रत्ना उपप्रवर्तिनी प. पू. कंचनकंवरजी म. सा., प.पू. किरणकंवरजी म. सा., प. पू. दिव्ययशाजी म. सा., प. पू. अरहश्रीजी म. सा., प. पू. मलयाश्रीजी म. सा., प. पू. अणिमाश्रीजी म. सा., प.पू. विराज्ञाजी म. सा. आदी महासतीवृंद विराजमान होत्या.
आनंद जयंती सप्ताह सोहळ्या साठी पाहुणे म्हणून नेमीचंद डुंगरवाल,विजय साकला,राजेश चोरडिया,खिंवराज मुथा, तसेच दूरदूर च्या गावचे संघ उपस्थित होते, आकुर्डी निगडी प्राधिकरण श्रावक संघाचे अध्यक्ष संतोष कर्णावट व सर्व विश्वस्त, आदी पदाधिकारी यांनी आनंद जयंती सप्ताह सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी लहान मुलांनी आचार्य आनंदऋषी यांच्या जीवनचरित्रावर सुंदर नाटिका सादर केली.
प. पू. कंचनकंवर म सा पुढे म्हणाल्या कि, महापुरुषांचे कार्य नेहमीच प्रेरणा देणारे असते, जे गुरुभगवंतांच्या सान्निध्यात आले ते कधी अपयशी ठरले नाही. त्यांच्या आयुष्याचे सोने झाले. आनंदऋषीजी हे श्रमण संस्कृतीचे युगपुरुष होते. त्यांनी आध्यत्मिकतेतुन मानवतेचा समाज घडविला. येत्या ४ ऑगस्ट रोजी उपप्रवर्तीनी प. पू. कंचनकंवरजी म. सा. यांचा ५९ वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा श्री. संघ आकुर्डी-निगडी-प्राधिकरणचा मानस आहे, त्याच वेळी तपगंगोत्री मीराबाई लुनिया यांच्या ५२२ आयंबिल तपश्चर्या पूर्तीनिमित्ताने त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे, असे आकुर्डी निगडी प्राधिकरण श्रावक संघाचे अध्यक्ष संतोष कर्णावट यांनी सांगितले.















