न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०१९) :- लायन्स क्लब ऑफ़ पुणे मेट्रोपोलिसच्या अध्यक्षपदी दीपा जाधव तर सचिवपदी प्रतीक चिनारिया, खजिनदारपदी कांता सोनार यांची निवड करण्यात आली. काळेवाडी येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात माजी प्रांतपाल गिरीश मालपाणी यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना २०१९ -२० या कार्यकालासाठी शपथ दिली. या सोहळ्यास पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व लायन्स सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबचे प्रांतीय जनसंपर्क अधिकारी सुनिल जाधव यांनी स्वागत केले. मनोज बंसल यांनी आभार मानले. यावेळी लायन्स क्लबच्या प्रांत कार्यालयात सेवाकार्य करणारे कालू तायड यांना त्यांच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी मदत म्हणून २५०००/- चा धनादेश दिला.
हा सोहळा साजरा करण्यासाठी क्लबचे अनूप ठाकुर, दीपक सोनार, भाग्यलक्ष्मी कटारी, गुलशन पाल, रेणु कुलकर्णी, छाया वऱ्हाडे यांनी विशेष सहकार्य केले.















