न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ ऑगस्ट २०२६) :- यमुनानगर, निगडी येथे फोर्स ट्रॅव्हलरच्या धडकेत २५ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी वाहनचालकाविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३५ वाजता आशिष हौसिंग सोसायटी, सेक्टर २१, स्कीम क्रमांक १० समोरील रस्त्यावर हा अपघात झाला. श्रद्धा राजाराम माने (वय २५) या पवळे ब्रिजकडून यमुनानगरकडे कंपनीत कामावर जात असताना त्यांच्या एमएच ५० पी ७४२५ या मोपेडला मागून भरधाव आलेल्या एमएच १२ डब्ल्यूजे ४९५१ क्रमांकाच्या फोर्स ट्रॅव्हलरने जोरदार धडक दिली.
या अपघातात श्रद्धा माने गंभीर जखमी झाल्या व त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. याप्रकरणी दीपक हनमंत माने (रा. रावेत) यांच्या फिर्यादीवरून चालक सुनील प्रकाश कवटेकर (रा. कडवाडी, ता. पाटण, जि. सातारा) याच्याविरुद्ध बीएनएस व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.


















