न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०१९) :- प्रभाग क्रमांक २२ काळेवाडी नढेनगर भागातील ९० ते १०० टक्के गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन आ. लक्ष्मण जगताप यांनी त्या विद्यार्थ्यांना मोबाईल टॅब, स्कुल बॅग व सन्मान पत्रक देऊन त्यांचा गौरव केला.
त्यावेळी स्वीकृत नगरसेवक विनोद तापकीर, नगरसेविका नीता पाडाळे, मंडल अध्यक्ष प्रमोद ताम्हणकर, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष वीर काका, विलास पाडाळे व इतर मान्यवर व भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक २२ चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.


















