न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील ‘अ’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्र. १० मौजे पिंपरी व प्रभाग क्र. १४ मौजे आकुर्डी येथे आज (दि. ३०) रोजी बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने ११ दुकानासमोरील अनाधिकृत पत्राशेड (क्षेत्र २०८३.०० चौ. फुट) व १ आर. सी. सी. घर (क्षेत्र ७००.४० चौ. फुट) असे एकुण २७८४.०० चौ.फुट बांधकामांवर कारवाई करणेत आली.
सदर कारवाई शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी यांचे मार्गदर्शनाखाली उपअभियंता नरेश रोहिला, ३ कनिष्ठ अभियंता व ४ बीट निरीक्षक यांचे पथकाने केली.
सदर कारवाईस महानगरपालिका पोलिस – २२, स्थानिक पोलीस- ४, पोलिस ऑफीसर – १, १ डंपर, १ ब्रेकर, २ कॉम्प्रेसर ट्रॅक्टर, १० ठेकेदार मजुर, वायरमन-१, आग्निशामक दल, अँब्युलन्स यांचे सहाय्याने करणेत आली, अशी माहिती बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग (अ व ग) कार्यकारी अभियंता यांनी दिली.















