न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील माध्यमिक शाळेतील ८०% पेक्षा जास्त गुण मिळविणा-या व ३५% पेक्षा जास्त गुण मिळविणा-या अंध व अपंग गुणवंत विद्यार्थांना द्यावयाचे बक्षीसासाठी येणा-या सुमारे ३० लाख ७५ हजार रूपयासह १२ कोटी रूपयाच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते.
कासारवाडी जलतरण तलावास संरक्षण भिंत बांधणे व रस्ता विकसीत करणेकामी येणा-या सुमारे ७४ लाख ६२ हजार खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. रावेत जलशुध्दीकरण केंद्रांचे जागेतून पर्यायी रस्त्याकरीता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस हस्तांतर करावयाच्या जागेचे हस्तांतर मूल्य ६ कोटी ५६ लाख महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळास अदा करावयाच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. ९ शाहूनगर येथे कै. सदाशिव बहीरवाडे मैदानाभोवती सीमाभिंत बांधणे व इतर अनुषंगिक कामे करणेकामी येणा-या सुमारे ५६ लाख ६७ हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. ६ धावडेवस्ती मधील भैरवनाथ शाळेशेजारील नाल्यावर सी डी वर्क बांधणेकामी येणा-या सुमारे ५२ लाख ५० हजार रूपयाच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. ४ रामनगर बोपखेल येथील नाला पाईपलाईन टाकून बंदीस्त करणेकामी येणा-या सुमारे १ कोटी ३४ लाख रूपये खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. रस्ते खोदाई परवानगीची प्रक्रिया संगणकीय प्रणाली व्यवस्थापन करणेकामी व मोबाईल अॅपविकसित करणेकामीयेणा-या सुमारे २२ लाख ६३ हजार रूपयाच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.















