न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑगस्ट २०१९) :- साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या निगडी येथील पुतळ्यास तसेच महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, मनसे गटनेते सचिन चिखले, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे. नगरसदस्या अनुराधा गोरखे, कमल घोलप, नगरसदस्य राहूल भोसले, समीर मासुळकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, मुख्य लिपीक रमेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
निगडी येथे झालेल्या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, मनसे गटनेते सचिन चिखले, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे. नगरसदस्या अनुराधा गोरखे, कमल घोलप, सुमन पवळे, प्रियंका बारसे, नगरसदस्य उत्तम केंदळे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समितीचे अध्यक्ष सतिश भवाळ, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, दरम्यान साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात यमुनानगरचे.टी.बी. युनिट यांनी आयोजित केलेल्या क्षयरोग निदान शिबिराचे उद्घाटनही महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते झाले.















