न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑगस्ट २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथिनिमित्त निगडी येथिल त्यांच्या पुतळ्यास महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, मनसे गटनेते सचिन चिखले, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या कमल घोलप, सुमन पवळे, नगरसदस्य उत्तम केंदळे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, आदी मान्यवर उपस्थित होते.















