न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑगस्ट २०१९) :- राष्ट्रवादीचे खा. अमोल कोल्हे आज पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना कोल्हे म्हणाले की, मागील निवडणुकीपेक्षा भोसरीतून विरोधकांचे ५० हजारांनी मताधिक्य कमी केले आहे. त्यामुळे आगामी भोसरी विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचाच आमदार होणार. नागरिक आमदाराच्या कारभाराला वैतागले आहेत. त्यामुळे यंदा परिवर्तन होणारच व राष्ट्रवादीला संधी मिळणारच असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
एखादा इच्छुक पदाधिकारी मुलाखातीला गेला नाही म्हणजे तो पक्षासोबत नाही, असे नाही. काही कारणांमुळे मुलाखतीला जाता येत नाही. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील मुलाखत देता आली नव्हती. त्यामुळे तो उमेदवार इतर पक्षांच्या वाटेवर असल्याची बातमी खोटी आहे. विरोधक जाणूनबुजून अशा बातम्या पेरत असतात, असेही ते म्हणाले.












